धुळे : अभिनेता सलमान खान प्रकरणात ज्या मयत पोलीस कर्मचारी आणि सलमानचा तत्कालीन बॉडीगाड्र रवींद्र पाटील यांच्या कुटुंबीयांनी सलमान खानाला मिळालेल्या शिक्षेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
प्रकरणाच्या निकालाला उशीर झाला असला तरी न्याय व्यवथेवर पूर्ण विश्वास होता आणि तो विश्वास सार्थ ठरला आहे असे मयत रवींद्रच्या आईने सांगितले आहे. न्यायालयाने योग्य निकाल दिला असून त्याबाबत आपण अधिक बोलू इच्छित नाही असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.
अपघात सलमान खानने केला मात्र त्याची शिक्षा पाटील कुटुंबियाला मिळाल्याचे त्यांच्या घरी भेट दिल्यावर लक्षात येते. बहुचर्चित अशा सलमान खानच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा काल निकाल लागला. सलमान या प्रकरणात दोषी आढळलाय. त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय तसंच २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आलाय. पण, ही शिक्षा रवींद्र पाटीलच्या उद्ध्वस्त आयुष्यासमोर काहीच नाही. रवींद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रवींद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही. ३ ऑक्टोबर २००७ रोजी रवींद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.