हिंगोली : आज, पहिला श्रावणी सोमवार... शिवभक्तांमध्ये हा दिवस धार्मिक आणि महत्त्वाचा मानला जातो... आणि महाराष्ट्रात या दिवसाचं पावसाच्या रिमझिम सरींनी स्वागत होताना दिसतंय.
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथचे शिवमंदीर आज भक्तांनी फुलून गेलंय. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग हे शिव आणि विष्णूचे एकात्म रुप मानले जातं. त्यामुळे येथे बेल आणि तुळस दोन्ही वाहतात.
या ठिकाणी गंगेच्या पाण्यानं जलाभिषेक करण्याचीही परंपरा आहे. त्यामुळे पायी दिंड्या मोठ्या प्रमाणात येतात.
हे मंदिर हेमाडपंथी असून अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केलाय. संत नामदेवांच्या भक्ती सामर्थ्यानं या मंदिराच्या प्रवेशद्वाराने दिशा बदलण्याचीही आख्यायिका आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.