www.24taas.com, नवी दिल्ली
राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून 778 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अर्थमंत्री पी चिदम्बरम नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोन्टेकसिंग अहलुवालिया यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
राज्यातल्या 16 जिल्ह्यांमधील तब्बल 125 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. या तालुक्यांमधील दुष्काळ निवारणासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. शेतीसाठी 563 कोटी रूपये, फळबागांसाठी 91 कोटी रूपये जनावरांसाठी 72 कोटींची मदत, तर पाणी पुरवठ्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
मात्र, केंद्राची 778 कोटींची ही मदत राज्याला पुरेशी ठरणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळाने होरपळत आहे. त्यामुळे या भागांसाठी निधी उपलब्ध होणं गरजेचंच होतं. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्राला निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.