मुंबई : रत्नागिरीत निवळी येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित आज करण्यात आला. यावेळी कोकणाला देताना हात आखडता घेतला नाही.
रत्नागिरीजवळ निवळी येथे या महामार्गाच्या कशेडी ते लांजा या टप्प्याच्या चौपदरीकरण भूमिपूजन कार्यक्रम झाला. यावेळी खास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना निमंत्रित केले. त्यावेळी त्यांनी गडकरींचे कौतुक केले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच कोणातील विद्यमान मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते.
- पनवेल-महाड-पणजी असा ४७१ किलोमीटरचा हा महामार्ग रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयांतून जातो.
- ३ टप्पे असे - कशेडी खवटी ते परशुराम घाट (४३.८० कि.मी.),
- आरवली ते कांटे (४० कि.मी.)
- कांटे ते वाकेड (५०.९० कि.मी.) या कामांसाठी सुमारे तीन हजार ५३० कोटी रुपये खर्च अपेक्षित.
- चौपदरीकरणाच्या या प्रकल्पाला सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च येणार
- त्यापैकी एक टक्का रक्कम खर्च करून हा महामार्ग हरित द्रुतगती महामार्ग म्हणून ओळखला जाण्यासाठी वनीकरण
- सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची घोषणा
- महामार्गासाठी भूसंपादन करताना जमीन देणाऱ्यांना सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ४० लाख ते एक कोटी रुपयांचा मोबदला दिला जाणार.
- रत्नागिरी – कोल्हापूर आणि गुहागर – कराड महामार्गांच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असून निवळी ते जयगड रस्ता रुंदीकरण करण्यात येणार
- जयगड येथे मेरीटाइम विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ५० कोटी रुपये देण्याची घोषणा
- नितीन गडकरी यांनी १८ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून त्यापैकी साडेतीन हजार कोटी रुपयांच्या या कामास सुरुवात
- राष्ट्रीय महामार्गांची लांबी दुप्पट करण्याचे काम करतानाच नितीन गडकरी यांनी एक लाख कोटींची रस्त्यांची कामे एकट्या महाराष्ट्रात सुरू केलीत
- कोकण किनारपट्टीचा विकास करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- कोकणात ग्रीन रिफायनरी सुरू करण्याचा निर्णय
- एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार
- पाच हजार एकरावर जंगल आणि हरित पट्टा निर्माण करण्यात येणार