औरंगाबाद : जाहीर तसेच राजकीय कार्यक्रमात नंग्या तलवारी भेट देण्याच्या पद्धतीविरोधात औरंगाबाद खंडपीठात संजय काळे आणि संदीप कुळकर्णी यांनी याचिका दाखल करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूकांवेळी नगर जिल्ह्यांतील प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य काही नेत्यांना देण्यात आलेल्या तलवारींवरून ही याचिका दाखल केलीय. या प्रकरणी केंद्र सरकारला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.
उत्तर देण्यास वेळ द्यावा, अशी विनंती राज्य सरकारनं हायकोर्टात केल्यानं, त्यांना ८ जुलैपर्यंत वेळ देण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारलाही शपथपत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.
नंग्या तलवारी भेट देणं, स्विकारणं कायद्यानं गुन्हा आहे. पंतप्रधानांसारख्या मोठ्या व्यक्तीच्या सुरक्षेत यामुळे अडचणही येवू शकते म्हणून ही याचिका दाखल करण्यात आल्याचे याचिकाकर्ते यांचे म्हणणे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.