www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्रात यंदा मान्सून सामान्य असणार आहे किंवा त्यापेक्षाही जास्त पडणार आहे. येत्या दोन महिन्यात दुष्काळी महाराष्ट्राचं चित्र बदलून हिरवंगार होण्याची शक्यता आहे.
हवामानाचा अंदाज वर्तवणा-या स्कायमेट एजन्सीनं ही माहिती दिली आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस होणार आहे. त्यामुळे धान, सोयाबीन, कापूस आणि तूर डाळीची पेरणी वेळेवर होणं शक्य होणार आहे. सध्या दुष्काळामुळे महाराष्ट्रात थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जमीन कोरडीठाक पडली आहे.
आता हवामानाच्या हा अंदाज थोडी आशा घेऊन आलाय. शेतक-याचं दुःख दूर करुन त्याच्या चेह-यावर हसू आणण्याचं सामर्थ्य पावसातच आहे. पण हे चित्र पाहण्यासाठी दोन महिने वाट पहावी लागणार आहे.