हिंगोलीतील सिंदगी गाव परिसरात ढगफूटी

कळमनुरी तालुक्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. सिंदगी गाव परिसरात ढगफूटी झाली. यामध्ये गावातल्या अनेक घरांचं अतोनात नुकसान झालं आहे. होतेवारंगा डोंगरकडा, दांडेगाव, रेडगाव परीसरात तासभर मुसळधार पाऊस झाल्यानं, नद्यानाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागलेत. कयादू नदीचं पात्र ओसंडून वाहू लागलंय. अशाच अलोट पाण्याच्या प्रवाहात एकाचा मृतदेह वाहून गेला. दरम्यान कळमनूरी तालुक्यातल्या सालापूर आणि जवळा पांचाल नदीला पूर आल्यानं रेडगावचा संपर्क तुटलाय. 

Updated: Jun 29, 2016, 10:29 PM IST
हिंगोलीतील सिंदगी गाव परिसरात ढगफूटी title=

हिंगोली : कळमनुरी तालुक्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. सिंदगी गाव परिसरात ढगफूटी झाली. यामध्ये गावातल्या अनेक घरांचं अतोनात नुकसान झालं आहे. होतेवारंगा डोंगरकडा, दांडेगाव, रेडगाव परीसरात तासभर मुसळधार पाऊस झाल्यानं, नद्यानाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागलेत. कयादू नदीचं पात्र ओसंडून वाहू लागलंय. अशाच अलोट पाण्याच्या प्रवाहात एकाचा मृतदेह वाहून गेला. दरम्यान कळमनूरी तालुक्यातल्या सालापूर आणि जवळा पांचाल नदीला पूर आल्यानं रेडगावचा संपर्क तुटलाय. 

नदीचं पाणी वाढल्यास वडगाव डिग्रस बुद्रुक दांडेगावला धोका निर्माण होऊ शकतो. नदी काठावरची हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे या जमिनीवरची पिकं खरडून जाण्याची भीती आहे. तर परभणीमध्येही पाऊस बरसल्यानं खरीपाच्या पेरण्यांची लगबग वाढलीय.