ठाणे : मूल होत नाही म्हणून दाम्पत्याला स्वतःसमोर संभोग करायला लावणाऱ्या आणि स्वतः देखील पीडित महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या योगेश कुपेकर या भोंदूबाबाला वर्तकनगर पोलिसांनी अटक केलीय.
धक्कादायक म्हणजे, गेली दोन ते अडीच वर्षे त्याचे हे अघोरी कृत्य सुरु होतं. पीडित दाम्पत्याच्या घरी जाऊन मूल होण्यासाठी तो त्यांना हे कृत्य करायला लावायचा....
२०१३ साली ठाण्याला राहणाऱ्या या जोडप्याचं लग्न झालं होतं... त्यानंतर आपल्या घरी पाळणा हालण्याच्या आशेनं त्यांनी योगेश कुपेकर (४२ वर्ष) या भोंदूबाबाला गाठलं.
या जोडप्याचं पुन्हा विवाहाचा घाट घातला गेला... त्यानंतर या दाम्पत्याला आपल्यासमोर सेक्स करा... त्यानंतर मंत्रोच्चार झाल्यानंतरच मूल होऊ शकेल... असं सांगितलं. यासाठी पतीनंही आपल्या पत्नीला समजावलं. हा प्रकार पार पडल्यानंतर या भोंदूबाबानं पत्नीवर एकांतात काही विधी करायचे आहेत, असं सांगत पतीला बाहेर घालवलं.
त्यानंतर कुपेकर यानं या महिलेचा लैंगिक छळ केला, अशी तक्रार महिलेनं नोंदवलीय. कुपेकरच्या अश्लील चाळ्याचा पाढा या महिलेनं आपल्या पतीसमोर वाचला... तिच्या आत्महत्या करण्याच्या धमकीने अखेर पतीने पोलीसात तक्रार केलीय.
याप्रकरणी पोलिसांनी योगेश कुपेकरला पनवेलमधून त्याच्या राहत्या घरातून अटक केली असून त्याच्यावर बलात्कार, फसवणूक, जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.