कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांची उचलबांगडी

कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांची अखेर महापौरपदावरून उचलबांगडी झालीय. त्यांचं नगरसेवक पदही रद्द सरकारनं रद्द केलंय. 

Updated: Jun 18, 2015, 08:16 PM IST
कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांची उचलबांगडी title=

कोल्हापूर: कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांची अखेर महापौरपदावरून उचलबांगडी झालीय. त्यांचं नगरसेवक पदही रद्द सरकारनं रद्द केलंय. 

महापौर तृप्ती माळवींना लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ अटक झाली होती. मात्र तरीही त्या पद सोडायला तयार नव्हत्या. अखेर कोल्हापूर महापालिकेनं तसा ठराव करून, तो सरकारला पाठवला. 

त्यानुसार तृप्ती माळवी यांची सरकारनं महापौरपदावरून उचलबांगडी केलीय. तशा आशयाचा मेल सरकारनं कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना पाठवलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.