मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला निवासी डॉक्टराचा संप अजूनही सुरूच आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानंतर 'मार्ड'ने निवासी डॉक्टरांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलंय, मात्र 'मार्ड'नं संप मागे घेतला असला तरी राज्यभरातील निवासी डॉक्टर आपली भूमिका कायम ठेवली आहे.
निवासी डॉक्टरांचा रजेचा निर्णय वैयक्तिक होता, त्यामुळे निवासी डॉक्टरांनी सेवेत रुजू व्हावं असं आवाहन आम्ही करत आहोत असं मार्डच्या वतीनं सांगण्यात आलं. लेखी आश्वासन मिळेपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा निवासी डॉक्टरांनी घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्य भेटीनंतरही डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला नव्हता.