मुंबई : राज्यातील एसटी बस स्थानकांवर स्वस्त औषधांची दुकाने सुरु करणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केलीय.
प्रधानमंत्री भारतीय जन-औषधी परियोजनेंतर्गत राज्यातील 597 बस स्थानकांवर स्वस्त औषध दुकाने म्हणजेच जेनेरिक औषधं उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे योजना राबवणारं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे देशातलं पहिलं महामंडळ ठरलंय.
परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि बीपीपीआय यांच्यामध्ये एसटी बस स्थानकांवर स्वस्त औषधाची दुकाने सुरु करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.