ठाण्याच्या महापौरपदासाठी मीनाक्षी शिंदे करणार अर्ज दाखल

ठाण्याच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून आज मीनाक्षी शिंदे अर्ज दाखल करणार आहेत. उपमहापौरपदासाठी रमाकांत मढवी अर्ज दाखल करणार आहेत. 

Updated: Mar 2, 2017, 11:29 AM IST
ठाण्याच्या महापौरपदासाठी मीनाक्षी शिंदे करणार अर्ज दाखल  title=

ठाणे : ठाण्याच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून आज मीनाक्षी शिंदे अर्ज दाखल करणार आहेत. उपमहापौरपदासाठी रमाकांत मढवी अर्ज दाखल करणार आहेत. 

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यानंतर दोघंही आज अर्ज करणार आहेत. मीनाक्षी शिंदे या शिवसेना नगरसेवक म्हणून तिस-यांदा निवडून आल्यात. 

महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. अभ्यासू नगरसेविका ही त्यांची आणखी एक ओळख. यंदा ठाणे महानगरपालिकेचं महापौरपद महिल्यांच्या खुल्या गटासाठी आरक्षित आहे. 

आमदार खासदारांच्या नात्यातील काही महिलादेखील महापौरपदाच्या शर्यतीत होत्या. त्यामुळं शिवसेनेचं स्थानिक नेतृत्व कुणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ घालतं, हे पाहणं औत्सुक्याचं होतं. अखेर अनुभव आणि अभ्यासू नगरसेविका असलेल्या मीनाक्षी शिंदे याच ठाण्याच्या महापौर होणार, यावर शिक्कामोर्तब झालंय.