'आरएसएस'च्या बालेकिल्ल्यात 'एमआयएम'नं थोपटले दंड

'एमआएम' अर्थात 'ऑल इंडिया मजलीस-इ-इत्तेहादूल-मुस्लिमीन'चे अध्यक्ष असुद्दिन ओवेसी यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली असतानाच, या महिन्याच्या अखेरीस त्यांची नागपूरला सभा होऊ घातलीय. 

Updated: Feb 3, 2015, 04:26 PM IST
'आरएसएस'च्या बालेकिल्ल्यात 'एमआयएम'नं थोपटले दंड title=

नागपूर : 'एमआएम' अर्थात 'ऑल इंडिया मजलीस-इ-इत्तेहादूल-मुस्लिमीन'चे अध्यक्ष असुद्दिन ओवेसी यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली असतानाच, या महिन्याच्या अखेरीस त्यांची नागपूरला सभा होऊ घातलीय. 

नागपूरला पक्षाचं नेटवर्क वाढवण्याकरता ही सभा होणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्यात येणार असल्याचं 'एमआयएम'चे विदर्भ प्रवक्ते शकील अहमद पटेल यांनी म्हटलंय.

भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून संघाच्या हिंदुत्ववादी भूमिकेला आपला विरोध असल्याचंही ते म्हणाले. आपला पक्ष पूर्णपणे धर्मनिरपेक्ष असल्याचा दावाही पटेल यांनी केलाय. २८ फेब्रुवारीला होणाऱ्या या सभेला परवानगी मिळेल अशी खात्री आहे... तसं झालं नाही पक्ष पुढील विचार करेल, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एमआयएमच्या प्रक्षोभक भाषेबद्दल आक्षेप नोंदवतानाच त्या पक्षाचं आव्हान स्वीकारण्यास तयार असल्याचंही संघाचे नेते सांगत आहेत. 

एमआयएम म्हणजे 'ऑल इंडिया मजलीस-इ-इत्तेहादूल-मुस्लिमीन' या राजकीय पक्षाची ताकद महाराष्ट्रात वाढताना दिसतेय. 2012 मध्ये नांदेड महापालिकेत एमआयएमचे 11 नगरसेवक निवडून आलेत. त्यानंतर, गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने 24 जागा लढवल्या. यापैंकी महाराष्ट्र विधानसभेत दोन आमदारांनी बाजी मारली. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून इम्तियाज जलील आमदार आणि भायखळा मतदारसंघातून वारिस पठाण आमदार यांना या निवडणुकीत विजय मिळाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.