सोलापूर : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे.
संरक्षण मंत्र्यांनी विमान खरेदी केलं तर पंकजाने घोटाळा केला अशी चर्चा होते, अमेरिकन सरकारनं काही खरेदी केली तिथेही पंकजाने घोटाळा असा आरोप होतो, असं विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.
सोलापूरच्या माळशिरस इथल्या पंचायत समितीच्या नवीन इमारत लोकार्पण सोहळ्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विविध पक्षातील नेत्यांशी आपली मैत्री असल्याचंही त्यांनी सांगितले.