रत्नागिरी : एका अल्पवयीन मुलीनं लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या केलीय. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये धामेली गावात ही घटना घडली.
लैंगिक अत्याचारांनं निराशेच्या गर्तेत जाऊन या १५ वर्षीय मुलीनं साडीनं गळफास घेऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
संबंधित मुलीवर दोन तरुणांनी केलेल्या अत्याचारामुळे आत्महत्या केल्याची माहिती चिपळूणचे पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांनी दिलीय. मुलीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ही बाब समोर आलीय. चिठ्ठीत या दोन्ही तरुणांची नावंही मुलीनं लिहिली आहेत.
या आधारे कारवाई करत पोलिसांनी भाई कदम, आदिनाथ खेडकर या दोघांना अटक केलीय.
दरम्यान, शवविच्छेदनात ही मुलगी गरोदर असल्याची बाब समोर आलीय.