सोलापुरात भरधाव कारने एटीएम रांगेतील दहा जणांना उडवले

सोलापुरातल्या अत्तार नगरमध्ये आज एका दारुड्यानं एक कार एटीएमच्या रांगेत घुसवली. या अपघातात 10 जण जखमी झालेत. त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.  

Updated: Dec 9, 2016, 01:14 PM IST
सोलापुरात भरधाव कारने एटीएम रांगेतील दहा जणांना उडवले title=

सोलापूर : सोलापुरातल्या अत्तार नगरमध्ये आज एका दारुड्यानं एक कार एटीएमच्या रांगेत घुसवली. या अपघातात 10 जण जखमी झालेत. त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.  

केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर एटीएम तसेच बँकांबाहेर लोकांची मोठी गर्दी आहे. अत्तार नगरमध्ये बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसमोर पैसे काढण्यासाठी गर्दी होती. 

त्याच वेळी दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या आरोपीचा गाडीवरचा ताबा सुटला आणि तो थेट रांगेतच जाऊन धडकला. या अपघातात 10 जण जखमी झाले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपी चालकाला चांगलीच मारहाण केली.