पुणे : पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी सिंचन भवनान तोडफोड केली. पुण्याच्या खडकवासला धरणातून जिल्ह्यातील इंदापूर आणि दौंड तालुक्यांना एक टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झालाय.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेकरांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा मनसेचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्याच्या बहाण्यानं सिंचनभवनात घुसलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात धुडगूस घातला.
पुण्याच्या ग्रामीण भागाला कालव्याद्वारे पाणी देण्याला महापौरांसह शिवसेना तसेच मनसेचा विरोध आहे. बापट यांची ही हुकूमशाही असल्याचा आरोप करत मनसेनं हा विषय हिंसक मार्गानं चिघळवला आहे.