मुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प

मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वायू गळती झाल्याने वाहतुकीची कोंडी झालेय. गॅस टॅंकर पलटी झाल्याने वायू गळती झालेय.

Updated: Nov 14, 2015, 01:27 PM IST
मुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प title=

रत्नागिरी : मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वायू गळती झाल्याने वाहतुकीची कोंडी झालेय. गॅस टॅंकर पलटी झाल्याने वायू गळती झालेय.

खेड जवळील कशेडी घाडात एलपीजी गॅसची वाहतूक करणारा टॅंकर पलटी झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई - गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.

कशेडी घाटात टँकर पलटी झाल्याने एलपीजी गॅसची गळती झाल्याने वाहतूक रोखण्यात आलेय. तसेच गॅस परिसरात पसरल्याने भीतीचे वातावरण आहे. गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी अग्नी शमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत

 दरम्यान, महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय. तर काही वाहतूक विन्हेरे मार्गे वळविण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.