पुणे : पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर दिवसाकाठी ३० हजार वाहनं टोल न भरता जातात असा दावा कंत्राटदार कंपनीने केलाय. कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीवर टोल विरोधी कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केलाय. कंपनीच्या आकडेवारीनुसार १ एप्रिलला ८९ हजार ०४३ वाहनं एक्सप्रेस वे वरून गेली. त्यापैकी ५९ हजार २५५ वाहनांनीत टोल भरला. तर २९ हजार ७७८ वाहनांनी टोल भरला नाही.
२ एप्रिल रोजी देखील ३० हजार २१२ वाहनांनी टोल चुकवल्याचं कंपनीनं नमूद केलं आहे. हा प्रकार म्हणजे टोल वसुलीची आकडेवारी कमी दाखविण्याची क्लुप्ती असल्याचं याकसंदर्भात याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्यांनी म्हंटलय. पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वरील टोल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झालं असून ही टोल वसूली थांबवावी अशी मागणी त्यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे.