अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर: नागपूर शहरात प्राध्यापकाचा छळ करणाऱ्या आणि त्यांना नागपूर सोडण्यास भाग पाडणाऱ्या भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याच्या भावाला पोलिसांनी अटक केलीय. शिर्डी इथून अमित ठाकूर आणि त्याचा सहकारी निलेश उइके या दोघांना पकडण्यात आलं. ते दोघंही एका हॉटेलमध्ये लपून बसले होते.
आणखी वाचा - 'भाजप'च्या गावगुंडानं प्राध्यापकाची गाडी जाळली
नागपूरच्या प्रेरणा नगर इथं राहणाऱ्या सुमित ठाकूर आणि त्याचा भाऊ अमित ठाकूरनं हैदोस माजवला होता. तिथं राहणारे प्राध्यापक मल्हार म्हस्के यांना खूप त्रास दिला गेला. त्यांची गाडीही गुंडांनी जाळली. अनेक दिवसांपासून अमित ठाकूर पोलिसांना गुंगारा देत होता.
आणखी वाचा - भर चौकात गुंडानं तीन पोलिसांना चाकूनं भोसकलं
नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शिर्डी इथून या आरोपींना अटक केलीय. अमित ठाकूरवर म्हस्के यांच्या कारला आग लावल्याचा आरोप आहे. तर सुमित ठाकूरवर कारची तोडफोड आणि त्यांना धमकी देण्याचा आरोप आहे.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.