दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर आहेत. यासाठी राणे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीमध्ये राणे भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासूनच राणे हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत. वारंवार राणेंनी राज्यातल्या काँग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. नारायण राणे हे सगळ्याच पक्षांना हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व आहे. पण, त्यांच्या भाजप प्रवेशबद्दल प्रदेशाध्यक्ष स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेतील, भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.