ठाणे : पारसिक बोगद्याच्या वर वाढलेल्या लोकवस्तीचा येथील डोंगराला धोका निर्माण झाला असतानाच येथील रहिवाशांकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळेही या बोगद्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पारसिक बोगद्यावरची १०० घरं खाली करण्याची मनपाने नोटीस बजावली आहे.
रेल्वे प्रशासनानेही मंगळवारच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाचे परिक्षण करुन येथील संरक्षक भिंत नव्याने बांधण्यात येणार असल्याची माहिती दिली. परंतु ही भिंत ठाणे महानगरपालिका बांधणार आहे. कारण त्यांच्या हद्दीत ती येत असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
या भिंतीची उंची साधारणपणे ४ फूट असणार असून सध्याच्या ठिकाणाहून ती मागे सरकवण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाच्या पथकाने पाहाणी केली. या पथकामध्ये दिल्लीच्या रेल्वे बोर्डाचे मुख्य अभियंते सतीशकुमार पांडे हे आले होते.