मी तोंड उघडलं तर तुम्ही लपवून राहाल : पंकजा मुंडे

ग्रामविकास आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. माझ्या सेल्फीच्या मुद्द्यावरुन राजकारण करु नका, मी जर तोंड उघडलं तर तुम्ही तोंड लपवून राहाल, असा थेट इशारा पंकजा यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना दिलाय.

Updated: Apr 29, 2016, 11:19 AM IST
मी तोंड उघडलं तर तुम्ही लपवून राहाल : पंकजा मुंडे title=

अहमदनगर : ग्रामविकास आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. माझ्या सेल्फीच्या मुद्द्यावरुन राजकारण करु नका, मी जर तोंड उघडलं तर तुम्ही तोंड लपवून राहाल, असा थेट इशारा पंकजा यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना दिलाय.

सोशल मीडियावर पंकजा यांचा सेल्फी व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी चांगलेच तोंडसुख घेतले होते. भ्रष्टाचार आणि दुष्काळग्रस्त भागातील सेल्फीच्या मुद्द्यावरून लक्ष्य करणाऱ्या विरोधकांना पंकजा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेय. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी सर्वप्रथम स्वत:चे तोंड आरशात पाहावे. मी त्यांच्याविरुद्ध तोंड उघडायचे ठरवले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा हल्लाबोल चढवला.

 

पाथर्डी येथील एका कार्यक्रमात पंकजा यांनी हा इशारा दिला. यावेळी पंकजा यांनी धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केले. मी मंत्री झाल्यापासून दोन वर्षात कुणाच काय वाकडे केले? मनात आणले असते तर मी सहजपणे तसे करू शकले असते. रक्ताच्या नात्याशी प्रतारणा करणाऱ्यांचे घोटाळे मी बाहेर काढले तर त्यांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही, असा थेट इशारा भाऊ धनंजयना दिलाय.