"हे सरकार शेतकरीविरोधी", राहुल गांधीची घणाघाती टीका

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत, ते शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत असतांना भाजपला टार्गेट करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीयत. राहुल गांधी म्हणाले, " विदर्भात मी यापूर्वीही आलो होतो, परंतु अशी परिस्थिती यापूर्वी मी कधीही पाहिली नाही. येथील शेतकऱ्यांची स्थिती चिंताजनक आहे, भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे".

Updated: Apr 30, 2015, 07:25 PM IST
"हे सरकार शेतकरीविरोधी", राहुल गांधीची घणाघाती टीका title=

अमरावती : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत, ते शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत असतांना भाजपला टार्गेट करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीयत. राहुल गांधी म्हणाले, " विदर्भात मी यापूर्वीही आलो होतो, परंतु अशी परिस्थिती यापूर्वी मी कधीही पाहिली नाही. येथील शेतकऱ्यांची स्थिती चिंताजनक आहे, भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे".

विदर्भातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना पदयात्रा पूर्ण करून राहुल गांधी यांनी तोंगलाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांचे राहुल यांनी आभार मानले.

‘संसदेत कृषिमंत्र्यांनी केवळ तीन आत्महत्या झाल्याचा खोटा दावा केला. तसेच हरियानामधील कृषिमंत्र्यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना भेकड म्हटले. हे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे सरकार नाही, तर फक्त काही निवडक उद्योगपतींचे सरकार आहे,‘ अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.