अलिबाग : रायगड जिल्ह्यात अलिबाग इथल्या पोलीस मुख्यालयात दुचाकी स्फोट घडवून सहकाऱ्याचा खून करणाऱ्या प्रल्हाद पाटील याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. रायगडचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी ही कारवाई केली.
अधिक वाचा : रायगडमध्ये मोटारसायकल स्फोटात पोलीस जखमी
पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याशी असलेल्या विवाहबाह्य संबंधातून २८ ऑक्टोबरला प्रल्हाद पाटीलने पोलीस मुख्यालयात स्फोट घडवून आणला होता. यात नीलेश पाटील या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. प्रल्हाद पाटीलची ही कृती गुन्हेगारी स्वरुपाची आणि विकृत मानसिकतेची असल्याने त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.