भाजपचे रविंद्र चव्हाण महिलांना घाणेरडे मेसेज पाठवतात - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा कल्याणमधील री डोंबिवलीत ओढली. नाशिकच्या विकासाचा आधार घेत कल्याण डोंबिवलीकरांना लुभावण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Oct 29, 2015, 08:49 PM IST
भाजपचे रविंद्र चव्हाण महिलांना घाणेरडे मेसेज पाठवतात - राज ठाकरे  title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा कल्याणमधील री डोंबिवलीत ओढली. नाशिकच्या विकासाचा आधार घेत कल्याण डोंबिवलीकरांना लुभावण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी त्यांनी डोंबिवलीचा भाजपचे आमदार यांचे प्रकरण जगासमोर काढले. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्याकडे रविंद्र चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. रविंद्र चव्हाण हे महिलांना घाणेरडे मेसेज पाठवतात असा आरोप लावण्यात आल्याचेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

वाचा राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 

- अच्छे दिनसाठी आता २५ वर्ष लावणार का? - राज ठाकरे 

- शंभर दिवसात अच्छे दिन आणणार होते - राज ठाकरे - 

- केंद्रातील एक नेते म्हणाले, अच्छे दिन आम्ही असं कधी म्हटलोच नव्हतो, हा तर सोशल मीडियात पसरलं होतं - राज ठाकरे 

- पाच वर्षात अच्छे दिन येणार नाही, त्यासाठी २५ वर्ष लागतील. म्हणजे २५ वर्ष यांना सोसायचं का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

- रविंद्र चव्हाण विरोधात तक्रार भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी अमित शहा यांना पत्र पाठवलं - राज ठाकरे 

- रविंद्र चव्हाण महिलांना घाणेरडे मेसेज पाठवतात - राज ठाकरे 

- यांचा खिसा फाटलेला, देणार कुठून पैसा - राज ठाकरे 

- संघाबद्दल मनसेला अभिमान आहे - राज ठाकरे 

- २० वर्ष सत्ता होती तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर आठवले नाही - राज ठाकरे 

- ब्राम्हण समाज डोंबिवलीत जास्त म्हणून सावरकर, टिळकांचे नाव घ्याचं - राज ठाकरे 

- बाबासाहेब पुरंदरे विरोधात रान उठलं तेव्हा कुठे गेली होती शिवसेना - राज ठाकरे 

बाबासाहेब पुरंदरेंच्या बाजूने मनसे ठामपणे उभी होती. - राज ठाकरे 

- बाबासाहेबांना विरोध शरद पवार यांच्या आशीर्वादांनी - राज ठाकरे 

- कोणी वाचत नाही आणि विरोध करतात. म्हणजे बाबासाहेबांनी जिजाऊंची तुलना कुंतीशी केली, पण त्याचा इतिहास माहित नाही - राज ठाकरे 

- ओवेसीने सीएसटीवर मोर्चा काढला होता, त्यांनी हैदोस घातला, तेव्हा कोणी उभ राहिलं नाही. मनसे एकमेव पक्ष होता तेव्हा कोणी नव्हतं - राज ठाकरे 

- नाशिकच्या विकासाची झलक कल्याणनंतर डोंबिवलीत दाखवली - राज ठाकरे 

- नाशिकमधील विकास काही रॉकेट सायन्स नाही - राज ठाकरे 

- महाराष्ट्र कसा घडायला हवा याचा अंदाज यायला पाहिजे म्हणून नाशिकचा विकास दाखवतोय - राज ठाकरे 

- नाशिकमधील वन खात्यांची जमीन विकसीत करायला दिली, त्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांचे आभार - राज ठाकरे 

- आम्ही त्याचे जाहीर आभार मानतो, त्यांनी कधी औदार्य दाखवले नाही, की मनसेने नाशिकाचा विकास केला आहे - राज ठाकरे 

- बोटॉनिकल गार्डन रतन टाटा करताहेत, गोदापार्क मुकेश अंबानी कराताहेत - राज ठाकरे 

- असे उद्योगपती मी कल्याण डोंबिवलीतही आणू शकतो - राज ठाकरे 

- नाशिकमध्ये माझी जमीन नाही, किंवा घर नाही - राज ठाकरे

- महाराष्ट्रातील शहर चांगली व्हावी अशी माझी इच्छा आहेत - राज ठाकरे 

- नाशिकमध्ये ३३ महिन्यात बेघरांना ३०० घरं दिलीत - राज ठाकरे 

- माझ्या हस्ते बेघरांना, झोपडपट्टीवासियांना घरं दिली - राज ठाकरे 

- गोदावरी नदीच्या पाण्यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करणार आहोत - राज ठाकरे 

- नाशिक शहराला २५ ते ३० वर्ष पाणी पुरेल इतकी व्यवस्था दोन वर्षात - राज ठाकरे 

- उपमहापौरांच्या वॉर्डात अनधिकृत बांधकाम  झाले - राज ठाकरे 

-  शहर सुंदर करणे माझ्या आवडीचा विषय - राज ठाकरे 

- डोंबिवलीकरांचा काय आयुष्य आहे का? - राज ठाकरे 

- असं आयुष्य जगाचं असेल तर तुमचं आयुष्य लखलाभ लाभो - राज ठाकरे 

- भाजप-शिवसेनेकडे पैसा कुठून आला, कुठून ओतताहेत - राज ठाकरे 

- भारतात अशा १०० बारामती व्हायला पाहिजे - राज ठाकरे 

- मोदी म्हणतात, मी शरद पवारांचा सल्ला घेतो - राज ठाकरे 

- संपूर्ण सत्ता माझ्या हातात द्या-  राज ठाकरे 

- संपूर्ण सत्ता द्या, करून दाखवलं नाही तर पुन्हा कल्याण डोंबिवलीत मतं मागायला येणार नाही - राज ठाकरे 

- माझ्या हस्ते बेघरांना, झोपडपट्टीवासियांना घरं दिली - राज ठाकरे 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.