रायगड : रेल्वे दरवाढीनंतर आता शेतमालाच्या दरावरून मोदी सरकारला शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत. केंद्र सरकारनं शेतमालाच्या ठरवलेल्या किमान आधारभूत किंमतींना दुसरं तिसरं कुणी नव्हे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनंच आक्षेप घेतलाय. एवढंच नव्हे तर आधारभूत किंमत वाढवून दिल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला दिलाय.
शेतमालाच्या आधाभूत किंमतीत सरकारनं केवळ एक ते दोन ट्क्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ पुरेशी नसल्याचं शेट्टींचं म्हणणंय. तसंच केंद्र सरकारनं घटक पक्षांशी चर्चा न करताच हा निर्णय घेतल्याचा आरोपही राजू शेट्टींनी केलाय. महागाईवर नियंत्रणाच्या नावाखाली शेतक-यांचा बळी किती दिवस देणार? असा संतप्त सवाल शेट्टी यांनी मोदी सरकारला केलाय.
तसंच मोदींनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पन्नास टक्क्यांपर्यंत आधारभूत किंमती वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता कधी करणार असा सवालही शेट्टींनी केलाय. तर एक जुलैला केंद्रीय कृषीमंत्र्यांशी चर्चा करून शेतक-यांच्या भावना पोहचवणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.