सारंगखेडा : देशभरात घोडे खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोडे बाजराने आवघ्या चार दिवसात कोटीचा पल्ला गाठला आहे. या घोडे बाजरात चार दिवसात सव्वा कोटी रुपयांटी घोड्याची विक्री झाली आहे.
या बाजरात सर्वात जास्त महाग घोडा ११ लाखाला विक्री झाला आहे. चलन बंदीचा या घोडे बाजारावर परिणाम होईल असा अंदाज होता मात्र अश्व प्रेमींनी हा अंदाज चुकीचा ठरवला आहे. यात्रेच्या अन्य ठिकाणी काही मंदी पाहायला मिळत असली तरी अश्व बाजारात मोठे व्यवहार पाहायला मिळत आहेत.
या घोडे बाजारात प्रामुख्याने पांढरे घोडे विकले गेले आहेत. मारवाड , काठियावाडी पंजाबी असे विविध प्रकारचे घोडे या यात्रेचे आकर्षण ठरत आहेत.