पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: या मुलाखती घेत आहेत.
यावेळी राष्ट्रवादीतील इच्छुकांची संख्या घटली असली तरी त्यांच्यातील उत्साह दांडगा आहे. म्हणूनच राष्ट्रवादीकडून नशिब अजमावण्यासाठी मुलाखत स्थळी गर्दी झाली होती.
सध्या पुणे महापलिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र भाजपसाठीही सध्या अच्छे दिन आलेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. कदाचित म्हणूनच अजित पवार उमेदवार निवडीमध्ये इतक्या जातीने लक्ष घालत आहेत, अशी चर्चा आहे.