हजार जीवांचं मोल अवघे ३०० रुपये...

रेल्वेचा ट्रॅक तुटल्याचं लक्षात येताच जीवाची बाजी लावून एक्सप्रेस थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाला कोकण रेल्वेनं बक्षीस जाहीर केलंय... हे बक्षीस आहे अवघे ३०० रुपये...

Updated: Nov 14, 2014, 02:10 PM IST
हजार जीवांचं मोल अवघे ३०० रुपये... title=

रत्नागिरी : रेल्वेचा ट्रॅक तुटल्याचं लक्षात येताच जीवाची बाजी लावून एक्सप्रेस थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाला कोकण रेल्वेनं बक्षीस जाहीर केलंय... हे बक्षीस आहे अवघे ३०० रुपये...
गेल्या सोमवारी, कोकण रेल्वेवरील लाजूळ पुलावर रेल्वेचा ट्रॅक तुटल्याचं आढळल्यानंतर वेगानं येणारी कोकणकन्या एक्स्प्रेस थांबवण्यासाठी सचिन पाडावे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानानं मोठा धोका टळला होता. या कामगिरीसाठीच त्यांना हे बक्षीस जाहीर करण्यात आलंय. जिवाची बाजी लावून धावणाऱ्या आणि जवळपास हजार प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या पाडावे यांना बक्षीस मिळणार आहे... ३०० रुपये! कोकण रेल्वेने त्यांच्या पराक्रमाचं असंच मोल केलंय. याशिवाय आपल्या या कामगिरीबाबत मीडियाशी बोलल्याबद्दल त्यांना समज देण्यात आली ती वेगळीच...
काय घडलं होतं त्या दिवशी...
ट्रॅकमन असलेल्या सचिन पाडावे यांना रात्री गस्त घालताना लाजूळ पुलावर रेल्वे ट्रॅक तुटलेला आढळला. त्यांनी कंट्रोल रुमशी संपर्क साधण्याआधीच कोकण कन्या एक्स्प्रेस सुटली होती. त्यामुळे, ताशी ७५ किमी वेगानं येणाऱ्या रेल्वेला थांबवण्यासाठी पाडावे पुलापासून उक्षी स्टेशनच्या दिशेने धावत सुटले...
जवळपास २०० मीटर अंतर धावून समोरून येणाऱ्या एक्स्प्रेसला हातातली बॅटरी दाखवून त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला... त्यांनी हे प्रसंगावधान दाखवलं नसतं तर एक्स्प्रेस थेट नदीत कोसळण्याचा धोका होता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.