पुणे : मावळ गोळीबार प्रकणात तत्कालीन पोलीस अधिक्षक संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच कांताबाई ठाकर यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप, आज याचिकाकर्ते आय जी खंडेलवाल यांनी केलाय.
मुंबई पुणे रोडवर शेतकऱ्यांनी जे आंदोलन केले होते त्यावेळी कांताबाई ठाकर या पोलीसांनी गोळीबार केला. हा गोळीबार चुकवण्यासाठी उताराच्या दिशेने धावल्या आणि त्या दिशेने फक्त संदीप कर्णिक यांनीच गोळीबार केला होता.
गोळीच्या बलेस्टिक अहवालावरुन स्पष्ट
हे संदीप कर्णिक यांच्या जबाबातून आणि कांताबाई ठाकर यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळीच्या बलेस्टिक अहवालावरुन स्पष्ट होत आहे. असं याचिकाकर्ते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
या अहवालामुळे न्यायालयालाही धक्का बसला, आणि ही बाब अहवाल किंवा तपासात का घेण्यात आली नाही, याबाबत राज्य सरकारला विचारणा केली ,आणि या मुद्दयांवर पुन्हा चौकशी करुन संदिप कर्णिक यांच्यावर योग्य ती कारवाई करा, तसेच एक आठवड्यांनी न्यायालयात काय कारवाई केली के सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
मावळ गोळीबार प्रकरण
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड महापालिकेस पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्यास मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यावेळी भारतीय किसान मोर्चातर्फे ९ ऑगस्ट २०११ रोजी काढलेल्या मोर्चात शिवसेना-भाजप आणि आरपीआय हे पक्ष सहभागी झाले होते. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर या मोर्चाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.