सांरगखेड्याच्या घोडबाजारात कोट्यवधींची उलाढाल

या वर्षी अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे घोडे बाजार संपला आहे, त्यातून करोडो रुपयंची उलाढाल झाली आहे.  

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 28, 2016, 06:50 PM IST
सांरगखेड्याच्या घोडबाजारात कोट्यवधींची उलाढाल

नंदुरबार : सारंगखेड्याचा चेतक फेस्टिव्हल या वर्षी अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे घोडे बाजार संपला आहे, त्यातून करोडो रुपयंची उलाढाल झाली आहे.  

चलन बंदीच्या पार्श्वभूमी वर होत असलेल्या घोडे बाजारला चलन बंदीचा फटका बसेल असा सर्वाचा अंदाज होता मात्र तो स्पेशल फोल ठरला.

बाजाराला चलन बंदीचा फटका बसू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने कॅशलेस करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने झाला.  

या वर्षीचा सारंगखेड्याचा चेतक फेस्टिव्हल ला पहिल्यादा राज्य शासनाने मदत करून भरीव निधी दिला.

पंधरा दिवसापासून सारागखेड्याच्या भूमीत अश्वमेळा भरला होता त्यात विविध जातिवंत घोडे आणि त्यांच्या कसरती अश्वप्रेमींना पहायला मिळाल्या.