‘क्लोजर रिपोर्ट’नंतर CBI अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्ये प्रकरणी सीबीआयने मावळ कोर्टात आठच दिवसांपूर्वी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यानंतर आता, या गुन्ह्याचे तपास अधिकारी एस. पी. सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय.

Updated: Aug 22, 2014, 12:51 PM IST
‘क्लोजर रिपोर्ट’नंतर CBI अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली title=

पुणे : आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्ये प्रकरणी सीबीआयने मावळ कोर्टात आठच दिवसांपूर्वी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यानंतर आता, या गुन्ह्याचे तपास अधिकारी एस. पी. सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय.

एस. पी. सिंग सुरुवातीपासून या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

दबावामुळेच सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सदर केला, असा आरोप सतीश शेट्टी यांचे भाऊ आणि या गुन्ह्यातील फिर्यादी संदीप शेट्टी यांनी केला होता. क्लोजर रिपोर्टविरोधात संदीप शेट्टी यांनी हाय कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यावर २५ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

तसंच, क्लोजर रिपोर्ट आणि त्या बरोबरची इतर कागदपत्रं सीबीआयने पुण्यातील शिनाजीनगर कोर्टात दाखल करण्याचे आदेश मावळ कोर्टाने क्लोजर रिपोर्टवर दिले आहेत. सेशन कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यासाठी मावळ कोर्टाने सीबीआयला २२ सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.