मुंबई : आंगणेवाडीतील भराडी देवीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी. कोकण रेल्वे मार्गावर आंगणेवाडी यात्रेसाठी जादा विशेष गाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय.
आंगणेवाडीसाठी सावंतवाडी-मुंबई सीएसटी-सावंतवाडी अशी गाडी सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने केलाय.
गाडी नंबर - ००११६ सावंतवाडी - मुंबई सीएसटी-सावंतवाडी आणि गाडी नंबर - ००११५ मुंबई सीएसटी - सावंतवाडी दरम्यान धावणार आहे. सावंतवाडीसाठी सोडण्यात येणारी विशेष गाडी ६ फेब्रुवारी २०१५ ते ८ फेब्रवारी २०१५ दरम्यान धावणार आहे.
सावंतवाडीवरुन मुंबईसाठी ००११६ ही गाडी पहाटे ४.३० वाजता सुटेल ती दुपारी १.२० वाजता मुंबईत पोहोचेल. ००११५ ही गाडी मुंबईहून सावंतवाडीसाठी दुपारी २.२० वाजता सुटेल ती रात्री १२.३० वाजता पोहोचेल.
या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ असे थांबे असतील ही गाडी १३ डब्ब्यांची असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.