अर्थमंत्री मुनगंटीवार यांची तिरुपतीवारी ठेकेदाराच्या खर्चाने

ठेकेदाराच्या खर्चानं अर्थमंत्री मुनगंटीवरांची सहकुटुंब तिरुपतीवारी केल्याचे पुढे आले आहे. मात्र, हा प्रवास खर्च पक्षानचं केल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दावा केलाय. 

Updated: Dec 12, 2014, 11:57 AM IST
अर्थमंत्री मुनगंटीवार यांची तिरुपतीवारी ठेकेदाराच्या खर्चाने title=

नागपूर : ठेकेदाराच्या खर्चानं अर्थमंत्री मुनगंटीवरांची सहकुटुंब तिरुपतीवारी केल्याचे पुढे आले आहे. मात्र, हा प्रवास खर्च पक्षानचं केल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दावा केलाय. 

दरम्यान, अर्थमंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली. तर विरोधकांची खुलाशाची मागणी केली.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाडोत्री विमानाने सहकुटुंब तिरूपतीवारी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
अर्थमंत्र्यांनी ठेकेदाराच्या खर्चाने सहल केल्याची माहिती मिळत असल्याने तर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र मुनगंटीवारांनी हा प्रवासखर्च पक्षाने केल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुनगंटीवारांच्या बचावात मैदानात उतरले आहेत. 

सुधीर मुनगंटीवारांनी या सहलीविषयी माझ्याशी चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी देत, तिरूपतीला त्यांना शपथविधी आधी जायचं असल्याने पक्षाने त्यांची व्यवस्था केल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. 

मात्र यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. रा. स्व. संघाची साधेपणाची शिकवण कुठे गेली? कंत्राटदाराला कोणता फायदा मुनगंटीवारांनी करून दिला आणि कोणत्या स्वरूपात? भाजपमधील अंतर्गत सत्तासंघर्षाचा हा परिणाम आहे का? एकीकडे सरकारी खर्चाला कात्री लावण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे विमान प्रवास करायचा, हे कितपत योग्य आहे?

तिरूपतीला विमानाने नेण्याइतपत मुनगंटीवारांनी काय केलं? मग इतर मंत्र्यांना भाजप कुठं नेणार? मुनगंटीवारांनी या कंत्राटदाराची 15 कोटींची कामं मंजूर केलीत, हे खरंय का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.