मुंबई : पावसाचे आगमनानंतर लोणावळा शहरातील पर्यटकांची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भुशी धरणावर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी भुशी धरणाच्या पाण्यात आपल्या अतिउत्साहीपणामुळे बळी जाणाऱ्या युवकांची संख्या लक्षात घेवून या धरणाची मालकी असणाऱ्या मध्य रेल्वेने धरणाच्या मुख्य भिंतीवर तारेचे कंपाऊंड घातले आहे. मात्र दिलेल्या सुचानाकडे दुर्लक्ष करून आणि हे कंपाऊंड ओलांडून धरणाच्या पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होताना दिसत नाही.
मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या या पर्यटकांना रोखायचे कसे हा प्रश्न आता प्रशासनाला सतावू लागला आहे. पर्यटकांनी देखील ही जबाबदारी ओळखून सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे आनंद घ्या पण जीवाला देखील सांभाळा असं आवाहन करत आहोत.