मस्तीत वागाल तर पाठिंबा काढून घेईल: उद्धव ठाकरे भाजपा इशाला

‘भाजपच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार जर मस्तीत वागत असेल तर मी त्याचक्षणी पाठिंबा काढून घेईन आणि हे सरकार रस्त्यावर आणून शकतो ’ असा निर्वाणीचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कल्याणमधील प्रचारसभेत भाजपला जोरदार आव्हान दिलं आहे.

Updated: Oct 30, 2015, 05:29 PM IST
मस्तीत वागाल तर पाठिंबा काढून घेईल: उद्धव ठाकरे भाजपा इशाला  title=

कल्याण : ‘भाजपच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार जर मस्तीत वागत असेल तर मी त्याचक्षणी पाठिंबा काढून घेईन आणि हे सरकार रस्त्यावर आणून शकतो ’ असा निर्वाणीचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कल्याणमधील प्रचारसभेत भाजपला जोरदार आव्हान दिलं आहे.

कल्याण डोंबिवलीत आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यावेळी आयोजित सभेत सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रीपदाचा उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा तात्काळ फेटाळला.
 
या राजीनामा फेटाळत उद्धव ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे तुम्हाला मंत्री भाजपने केलेलं नाही. हे मंत्रीपद शिवसेना आणि या शिवसैनिकांनी केलं आहे. त्यामुळे तुमचा राजीनामा मी स्वीकारणार नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.