उद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांना तंबी

मंत्रिपद देताना गुलाबराव पाटील यांना तंबी दिली होती. तुमची बुलंद तोफ बंद पडली तर तुमचा लाल दिवा काढून टाकू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

Updated: Oct 13, 2016, 11:58 PM IST
उद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांना तंबी

जळगाव : मंत्रिपद देताना गुलाबराव पाटील यांना तंबी दिली होती, तुमची बुलंद तोफ बंद पडली तर तुमचा लाल दिवा काढून टाकू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

शेतकरी आणि सर्वसामान्यांनवर अन्याय झाला, तर शिवसेना सरकारबरोबर राहणार नाही, असंही ते म्हणाले. तर शरद पवारांनी सत्तेवर असताना सोनिया गांधी यांच्या घरी  पाणी भरले. पंतप्रधान तुमचे होते तर आजपर्यंत सत्तेवर असताना शरद पवारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न का नाही सोडला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.