उल्हासनगर पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर

निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात ड्रोन कॅमे-याची नजर ठेवण्यात येणार आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संचलन केलं. संपूर्ण शहरावर लक्ष ठेवण्यासाठी 6 ड्रोन कॅमेरे वापरण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी सांगितलं. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 18, 2017, 08:57 AM IST
उल्हासनगर पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर title=

उल्हासनगर : निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात ड्रोन कॅमे-याची नजर ठेवण्यात येणार आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संचलन केलं. संपूर्ण शहरावर लक्ष ठेवण्यासाठी 6 ड्रोन कॅमेरे वापरण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी सांगितलं. 

उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 35 ते 40 टक्के इतकीच असते. कायम मतदानात निष्क्रियता दाखवणा-या उल्हासनगरच्या मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महापालिका नवनवीन क्लुपत्या आजमावयत आहे. 

आता महापालिकेने मतदानाच्या दिवशी सेल्फी स्पर्धा आयोजित केलीय. या स्पर्धेत मतदानाच्या दिवशी मतदाराने मतदान केल्यानंतर बोटाला शाई लावलेला फोटो 8329271483 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचाय. त्यातून प्रत्येक प्रभागातून 5 फोटो तर 20 प्रभागातून 100 फोटो निवडले जातील. या निवडक मतदारांना 2017-18 या चालू वर्षात मालमत्ता करात 25 टक्के सूट दिली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.