नागपूर : सलग तीनवेळा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणा-या विजय चौधरी याला सरकारी नोकरी देण्याबाबत, उशिरा का होईना पण सरकारला जाग आली आहे.
विजय चौधरीला नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. नोकरी देण्यासंबंधीचे नियम तयार करायचे असल्यामुळे विजय चौधरीला नोकरी देण्यात विलंब झाल्याचा खुलासा, मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहात केला.
विजय चौधरीच्या उल्लेखनीय कामगिरीकरता, मुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला आणि विधानसभेतल्या सर्व सभासदांनी त्याचं अभिनंदन केलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर, विजय चौधरीनं आनंद व्यक्त केला.