शिर्डी : शिर्डीत सध्या भाविकांची एकच रीघ लागलीय... ती भोजन तयार करणाऱ्या साईंच्या मूर्तीच्या दर्शनासाठी...
साईबाबा आपल्या भक्तांसाठी भोजन तयार करतात, अशी मूर्तिरुपी प्रतिकृती शिर्डीतील नवीन प्रसादालयासमोर तयार करण्यात आलेली आहे. या मूर्तीच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटामधून मंगळवारी थेंब थेंब पाणी पडत असल्याचं काही भाविकांच्या लक्षात आलं. जवळपास अर्धा तास मूर्तीच्या बोटांमधून पाणी खाली पडत होतं.
मूर्तीच्या बोटांमधून पाणी का पडत होतं? याचं शास्त्रीय कारण अद्याप माहीत पडलं नसलं तरी साईंच्या भाविकांना मात्र हा साईंचाच 'चमत्कार' असल्याची खात्री आहे. अर्थातच, व्हॉटसअप आणि सोशल मीडियामुळे ही बातमी पसरायला वेळ लागली नाही... प्रत्यक्षदर्शी भाविकांनी व कर्मचाऱ्यांनी मोबाईलवर त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ग्रुपवर टाकले... आणि साईंचा हा चमत्कार पाहण्यासाठी भाविकांनी एकच तुंबड गर्दी केली.
सध्या मूर्तीच्या बोटांतून पाणी ठिबकताना प्रत्यक्ष दिसत नसलं तरी सोमवारी ठिबकणाऱ्या पाण्याचे ओघळ पाहण्यासाठी बुधवारीही शिर्डीत प्रचंड गर्दी दिसली.
उल्लेखनीय म्हणजे, दूध पिणारा गणपती... गोड पाण्याचा समुद्र आणि आता बोटांतून पाणी ठिबकणारी साईंची मूर्ती अशी चर्चा भाविकांत ऐकायला मिळतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.