का दिला होता एकनाथ शिंदेंनी राजीनामा?

 भाजपकडून पोलिसांच्या मदतीने शिवसैनिकांची दडपशाही केली जात असल्याची टीका करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला... 

Updated: Oct 30, 2015, 05:44 PM IST
का दिला होता एकनाथ शिंदेंनी राजीनामा?  title=

कल्याण :  भाजपकडून पोलिसांच्या मदतीने शिवसैनिकांची दडपशाही केली जात असल्याची टीका करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला... 

शिंदे यांच्या भावनांशी सहमती व्यक्त करत उद्धव यांनी भाजपने तुम्हाला मंत्री केलेलं नाही, तर शिवसेनेनं, जनतेनं मंत्री केल्याचं म्हटंलय. 

अधिक वाचा : मस्तीत वागाल तर पाठिंबा काढून घेईल: उद्धव ठाकरे भाजपा इशाला

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातली मतभेद टोकाला पोहोचलेत. सरकार मस्तीत असेल तर आम्ही सरकारचा पाठींबा काढून घेऊ असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी कल्याणमध्ये दिला. 

अधिक वाचा : एकनाथ शिंदेंचा राजीनामा म्हणजे नाटक - मुख्यमंत्री

शिवसैनिकांना तडीपार कराल तर आम्ही सरकारला तडीपार करू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. मात्र या निमित्ताने आता दोन्ही पक्षातले ताणलेले संबंध सरकारच्या स्थैर्यावर परिणाम करतील का याची चर्चा सुरू झालीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.