लातूर : महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरुच आहेत. गोव्यामधील गँग रेपची घटना ताजी असतानाच आता राज्यातील लातूरमध्ये २५ वर्षीय विधवेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. बलात्कारानंतर तिला पेटविण्यात आले.
नराधाम अत्याचार करुन थांबले नाहीत. त्यांनी बलात्कारानंतर पीडित महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्नही करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात शिवली येथे ही खळबळजनक घटना घडली.
पोलिसांनी तिघा नराधमांना अटक केली आहे. याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.