पुणे : करणी करण्याच्या बहाण्याने एका महिलेची हत्या करण्याचा प्रकार पुण्यात हडपसरमधे उघडकीस आलाय. या प्रकरणी दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केलीय.
वैयक्तीक आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याचं आश्वासन या दोघांनी मृत महिलेला दिलं. त्यासाठी तिला त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने घेऊन बोलावलं.
जादूटोणा करत असताना तिला गळफास देऊन खून करण्यात आला.. घटनेनंतर महिलेचे दागिने घेऊन दोघंही फरार झाले.
या चोरीमुळे पोलिसांना संशय आला आणि त्यानुसार सापळा रचत दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.