महिला सॉफ्टवेअर इंजीनिअर बलात्कार-हत्या प्रकरणाचा आज निकाल

पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 8, 2017, 08:43 AM IST
महिला सॉफ्टवेअर इंजीनिअर बलात्कार-हत्या प्रकरणाचा आज निकाल

पुणे : पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे. मागील सुमारे ८ वर्षं पुण्याच्या विशेष नायायालयात या प्रकारणाची सुनावणी सुरु आहे. 

या प्रकरणात योगेश राऊत, विश्वास कदम आणि महेश ठाकूर हे आरोपी असून चौथा आरोपी राजेश चौधरी हा माफीचा साक्षीदार आहे. या चौघांनी ८ ऑकटोबर २००९ रोजी ३२ वर्षीय नयना पुजारीच अपहरण केलं होतं. 

नयना खराडीतील सिनेक्रोन कंपनीत कामाला होती. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर आरोपींनी तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं आणि त्यानंतर तिला पळवून नेऊन तिच्यावर वाघोली परिसरात बलात्कार केला. 

आरोपी केवळ बलात्कार करून थांबले नाहीत तर त्यांनी तिचा निघृण खूनही केला.