महिलांनी निवडणूक लढवू नये; मुस्लीम संघटनेचा अजब फतवा

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच 'मजिल्से सुरा उलेमा ए' या मुस्लीम संघटनेनं महिलांनी निवडणुका लढवू नये, असा अजब फतवा काढलाय. 

Updated: Oct 2, 2015, 11:23 AM IST
महिलांनी निवडणूक लढवू नये; मुस्लीम संघटनेचा अजब फतवा title=
फाईल फोटो

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच 'मजिल्से सुरा उलेमा ए' या मुस्लीम संघटनेनं महिलांनी निवडणुका लढवू नये, असा अजब फतवा काढलाय. 

या फतव्यामुळे शहरात एकच खळबळ उडालीय. 'मजिल्से सुरा उलेमा ए' ही मस्जिदची अर्थात स्थानिक धर्मगुरूंची संघटना आहे. कोल्हापुरात दीडशेहून अधिक मश्चिद आहेत. या सर्व धार्मिक ठिकाणी 'मुस्लीम महिलांनी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवू नये' अशा आशयाच्या फतव्याची पत्रकं वाटण्यात आलीत. 

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी सगळेच पक्ष आपली ताकद पणाला लावून करत आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे अनेक मुस्लीम महिलाही निवडणुका लढवण्यास इच्छुक आहेत.

पण, फतव्यामुळे अनेक इच्छुक महिलांनी निवडणुकीतून माघार घेतलीय. पण, काही महिलांनी मात्र या फतव्याच्या विरोधात जाऊन निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय ठामपणे घेतलाय. 

शाहू महाराजांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूर नगरित पहिल्यांदाच अशा प्रकारचा फतवा काढण्यात आलाय. याबाबत आम्ही शहरातील मुस्लीम नेत्यांची मतं जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, हे नेते याविषयी उघडपणे बोलायला तयार नाहीत. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.