www.24taas.com, मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईत किनारपट्टी रस्त्याच्या प्रस्तावित प्रकल्पाची घोषणा केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आलीय. भाजप शहराध्यक्ष राज पुरोहित यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
खार ते वर्सोव्यापर्यंत भुयारी रस्ता तयार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. सागरी सेतुमुळे किनारपट्टीवरील लोकांना सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यास कोणताही अडथळा येणार नाही याचीही काळजी घेण्यात आलीय. म्हणून समुद्रकिनारी लागून ४० ते ६० फुटाचा भाग हा लोकांना फिरण्यासाठी विकसित केला जाणार आहे.
३५ ते ३६ किलोमीटरचा किनारपट्टीला लागून असलेला रस्ता कांदिवलीत जाऊन मिळणार आहे. यासाठी १० हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित असल्याचं सांगण्यात येतंय.