नवी मुंबई : नवी मुंबईतील सिवूड येथील रिक्षाचालकांच अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. त्याचा लवकरात लवकर तपास करण्यासाठी रिक्षा संघटनांनी बंदही पाळला होता.
मात्र हा बहाद्दर रिक्शाचालक मछिंद्र भोईर स्वःताच गायब झाल्याचं समोर आलय. १५ दिवसांपुर्वी चार इसमांकडून बेदम मारहाण करत पैशाची लुट केल्याचा व्हीडीओ तयार करून त्यानं व्हॉट्सअप वर टाकला होता.
यानंतर तो गायब झाला होता. अखेर नाट्यमय रित्या भोईर हा नेरूळ रेल्वे स्थानकात पकडला गेला. चौकशी केली असता आपण स्वःताचं अपहरणाचं नाटक करून पळून गेलो होतो असा खुलासा त्यानं केला.