आंबेडकर स्मारकासाठी RPIने रेल्वे रोखली

इंदू मिलच्या जागेवरुन आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बोरिवली रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला. चर्चगेटकडे जाणारी रेल्वे अडवली. त्यामुळ काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Updated: Mar 17, 2012, 08:30 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

इंदू मिलच्या जागेवरुन आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी  बोरिवली रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला. चर्चगेटकडे जाणारी रेल्वे अडवली. त्यामुळ काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

 

 

यावेळी संतप्त २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. सरकारनं स्मारकासाठी  लवकर जागा दिली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.  इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी देण्याबाबत सरकारनं घोषणा केली मात्र त्यासंदर्भात अजूनही कारवाई होत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

 

 

विधानभवनावर धडक

इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी मिळावी, या मागणीसाठी रिपब्लिकन कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ५० ते ७० आरपीआय कार्यकर्त्यांनी आज  विधानभवनाच्या गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

 

आधी जागा द्या - आठवले

विधानभवनावर धडक मारण्याआधी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आझाद मैदानावर मोर्चाही काढला होता. इंदू मिलप्रकरणी शासनाने आमची भावना समजून घ्यावी आणि आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा लवकरात लवकर देण्यात यावी, अशी प्रतिक्रिया  रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.