कुटुंबावर प्राणघातक हल्ला, दोघे गंभीर

मुंबईतल्या दहिसरमध्ये तीस ते चाळीस तरुणांनी धुडगूस घालत एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी संध्याकाळी वैती कुटुंबिय दहिसरच्या मुव्हिटाईम थिएटरमध्ये अग्निपथ सिनेमा पाहण्यास गेले होते. चिकनी चमेली गाणं सुरु होताच सिनेमागृहातल्या तीस ते चाळीस जणांनी अश्लिल हरकती करण्यास सुरुवात केली. वैती कुटुंबियांनी याचा विरोध केला. मात्र हाच राग मनात ठेवून सिनेमा संपल्यावर या तीस ते चाळीस तरुणांच्या समूहाने वैती यांच्या गाडीवर हल्लाबोल केला.

Updated: Feb 3, 2012, 12:04 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

मुंबईतल्या दहिसरमध्ये तीस ते चाळीस तरुणांनी धुडगूस घालत एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, नऊ जणांना पोलिसांनी अटक गेली आहे. यातील काही तरूण अल्पवयीन आहेत.

 

 

 

गुरुवारी संध्याकाळी वैती कुटुंबिय दहिसरच्या मुव्हिटाईम थिएटरमध्ये अग्निपथ सिनेमा पाहण्यास गेले होते. चिकनी चमेली गाणं सुरु होताच सिनेमागृहातल्या तीस ते चाळीस जणांनी अश्लिल हरकती करण्यास सुरुवात केली. वैती कुटुंबियांनी याला विरोध केला. मात्र हाच राग मनात ठेवून सिनेमा संपल्यावर या तीस ते चाळीस तरुणांच्या समूहाने वैती यांच्या गाडीवर हल्लाबोल केला.

 

 

 

रॉड, हॉकी स्टिक आणि इतर शस्त्रांचा वापर करत या तरुणांनी वैती कुटुंबातल्या पुरुष आणि महिलांना अमानुष मारहाण केली. शिवाय त्यांनी त्यांच्या कारचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. याबाबत वैती कुटुंबियांनी१०० नंबरवर पोलिसांना संपर्क साधला मात्र त्यांच्याकडून हल्ल्याला गंभीरतेने घेतलं नसल्याचा आरोप वैती कुटुंबियांकडून करण्यात येतोय. थिएटरबाहेर उपस्थित जमावाने वैती कुटुंबियांची यावेळी मदत करण्याचा प्रयत्न केला.

 

 

 

तरुणांच्या या अमानुष मारहाणीत अमोल वैती आणि त्याचे काका गंभीर  जखमी झालेत. त्यांना अंधेरीतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये आयसीयूत दाखल करण्यात आलंय. दरम्यान याप्रकरणी पोलीसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात आता मारहाण आणि दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल केलाय. गेल्या वर्षी अशाच एका घटनेत दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता.

 

[jwplayer mediaid="40969"]